Zero Cost Term Plan in 2023 | झिरो कॉस्ट टर्म प्लॅन

टर्म इन्शुरन्स पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास विमा कंपनीकडून वारसदारांना मोठी रक्कम दिली जाते. जर तुम्ही कमी वयात टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेतली तर तुम्हाला वार्षिक 10000 रुपयेपर्यंत प्रीमियम भरून 1 करोड रुपयापर्यंतचे कव्हर मिळू शकते. पण समजा तुम्हाला कोणताही आर्थिक भार न पडता 1 करोड चे कव्हर मिळत असेल तर? होय, हे शक्य आहे Zero Cost Term Plan मुळे. चला तर मग आज आपण या लेखात झिरो कॉस्ट टर्म इन्शुरन्स म्हणजे काय, झिरो कॉस्ट टर्म प्लॅन कसे काम करतो, त्याचे फायदे काय याविषयी इत्यंभूत माहिती जाणून घेऊया.

Zero Cost Term Plan

 

झिरो कॉस्ट टर्म प्लान म्हणजे काय? What is Zero Cost Term Plan?

Zero Cost Term Plan मध्ये रेगुलर टर्म इन्शुरन्सच्या सर्व लाभांसोबतच पॉलिसीच्या ठराविक वर्षी पॉलिसीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यास, पॉलिसीधारकाने भरलेले सर्व प्रीमियम परत मिळण्याची खात्री असते. म्हणजेच एक प्रकारे पॉलिसी सुरू असेपर्यंत टर्म इन्शुरन्सचे कव्हर तर मिळतेच, सोबतच ठराविक वर्षानंतर पॉलिसी बंद करून भरलेले सर्व प्रीमियम परत मिळते. म्हणजेच तुम्हाला Zero Cost Term Plan घेताना कोणताही आर्थिक बोजा पडत नाही. परंतु खरंच कोणतीही कंपनी पॉलिसीधारकावर कोणताही आर्थिक बोजा न पडू देता तुम्हाला इन्शुरन्स कव्हर का बर देईल? विमा कंपन्या दरवर्षी करोडो रुपयांचे क्लेम्स देत असतात. तरीही तुम्ही भरलेले सर्व प्रीमियम तुम्हाला परत केले तर कंपनी नफा कसा कमविणार? खरी गंमत पुढे आहे. या प्लॅनचे नाव जरी झिरो कॉस्ट टर्म प्लॅन असले तरी या प्लॅनमधील अटी व शर्ती पाहिल्या तर याची खरी किंमत तुम्हाला कळेल.

झिरो कॉस्ट टर्म प्लॅन कसे काम करते? How Does Zero Cost Term Plan Work?

आपण Zero Cost Term Plan कसे काम करते हे एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया.उदाहरण : एका 30 वर्षे वयाच्या व्यक्तीला टर्म इन्शुरन्स प्लान घ्यायचा आहे. त्याला विमा एजंटकडून किंवा कंपनीच्या वेबसाईटवरून किंवा कस्टमर केअर एक्झिक्यूटिव्हकडून Zero Cost Term Plan बद्दल माहिती दिली जाते. जेव्हा त्या व्यक्तीला पॉलिसी बंद केल्यास प्रीमियम परत मिळण्याची माहिती दिली जाते तेव्हा तो व्यक्ती Zero Cost Term Plan घेण्यासाठी संमती देतो. यानंतर त्याला पॉलिसीच्या अटी व शर्ती सांगितल्या जातात. यातील एक अट अशी आहे की टर्म प्लानचा कालावधी 40 वर्षे किंवा त्यापुढे असेल तरच झिरो कॉस्ट टर्म प्लानचे फायदे मिळतील. म्हणजेच वयाच्या 70 वर्षेपर्यंत किंवा त्यापुढे कव्हर देणारी पॉलिसी या व्यक्तीला घ्यावी लागेल. यासोबतच पॉलिसीच्या 25 व्या वर्षी किंवा त्या व्यक्तीच्या वयाच्या 65 व्या वर्षी यापैकी जे आधी असेल तेव्हा पॉलिसी बंद केली तरच तुम्ही भरलेले प्रीमियम GST वगळून परत मिळेल. इतर कोणत्याही वेळी पॉलिसी बंद केल्यास प्रीमियम परत मिळणार नाही. म्हणजेच या उदाहरणामधील व्यक्तीला वयाच्या 55 व्या वर्षी पॉलिसी बंद करावी लागेल तरच त्यांनी भरलेल्या प्रीमियमची रक्कम परत मिळेल. एकदा पॉलिसी बंद केली तर ती पुन्हा पुनर्जीवित Renewal करता येणार नाही. वरील उदाहरणावरून Zero Cost Term Plan च्या अटी लक्षात येईल. या प्लॅनचे मार्केटिंग झिरो कॉस्ट म्हणून केले जात असले तरी पॉलिसीचा कालावधी जास्त असल्यामुळे प्रीमियम जास्त द्यावा लागतो. रेग्युलर टर्म प्लॅन व झिरो कॉस्ट टर्म प्लॅनच्या प्रीमियममध्ये तुमच्या वयानुसार जास्त फरक पडत नसेल तर झिरो कॉस्ट प्लॅन घेण्यास काही हरकत नाही.

झिरो कॉस्ट टर्म प्लॅन कोणी घेऊ नये?

समजा तुम्ही 35 वर्षे वयाचे आहात आणि तुम्हाला टर्म प्लॅन घ्यायचा आहे. जर तुम्ही आमच्या 9579929375 या नंबर वर संपर्क केलात तर आम्ही तुम्हाला टर्म प्लान किती कालावधीसाठी घेतलं पाहिजे याची योग्य माहिती देऊ. तुम्ही वयाच्या 58 किंवा 60 व्या वर्षी सेवानिवृत्त होत असाल तर या कालावधीपर्यंत तुमची मुले आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झालेली असतील. सोबतच तुमच्या मुला-मुलींचे लग्न, घर इत्यादी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पूर्ण झालेल्या असतील. त्यामुळे सहसा तुमच्या वयाच्या 60 वर्षानंतर तुम्हाला कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेची फारशी काळजी करण्याची गरज नाही. त्यामुळे तुम्ही वयाच्या 60 ते 65 व्या वर्षापर्यंतचा कव्हर घेणे सोयीस्कर ठरते. म्हणजेच 35 वर्षे वयाच्या व्यक्तीला 25 ते 30 वर्षे हा पॉलिसी कालावधी व्यावहारिकदृष्ट्या सोयीस्कर आहे. त्यामुळे Zero Cost Term Plan साठी 40 वर्षे कालावधीची पॉलिसी घेणे उचित ठरत नाही.मुळात टर्म प्लॅनचा उद्देश पॉलिसीधारकाच्या पश्चात त्याच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता प्रदान करणे हे आहे. वयाच्या 60 ते 65 वर्षापर्यंत तुमची मुले कमवायला लागली, तुमच्या मुलांचे लग्न झाले की ते आर्थिकदृष्ट्या तुमच्यावर अवलंबून नसतात. उलट तुमचा दैनंदिन खर्चही ते करू शकतात. त्यामुळे 60 ते 65 वर्षानंतरचे कव्हर देणारा टर्म प्लॅन घेण्याचे काही कारण नाही.

झिरो कॉस्ट टर्म प्लॅनचे गणित 

30 वर्षे वयाच्या व्यक्तीला 30 वर्षे कालावधीसाठी म्हणजेच वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत टर्म प्लॅन घ्यायचा असेल तर मासिक 1100 रुपयेपर्यंत प्रीमियम द्यावा लागतो. परंतु झिरो कॉस्ट टर्म प्लॅन घेण्यासाठी त्या व्यक्तीला 40 वर्षे कालावधीची म्हणजेच व्यक्तीच्या वयाच्या 70 व्या वर्षापर्यंतचे कव्हर देणारी पॉलिसी घ्यावी लागते. पॉलिसी कालावधी दहा वर्षांनी वाढत असल्यामुळे प्रीमियम 1400 ते 1450 रुपये द्यावा लागतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॉलिसीच्या 25 व्या वर्षी किंवा पॉलिसी धारकाच्या वयाच्या 65 व्या वर्षी पॉलिसी बंद करून प्रीमियम परत घेण्याचा विचार केला तरी तुम्ही भरलेले प्रीमियम मधून GST वजा करून उर्वरित रक्कम परत केली जाते. तसेच पॉलिसीच्या पहिल्या वर्षी जर तुम्ही वार्षिक 12 हजार रुपये प्रीमियम भरला असेल तर पॉलिसीच्या 25 व्या वर्षी GST वगळून 9000 ते 9500 रुपये परत मिळतील. पॉलिसीच्या 25 व्या वर्षी परत मिळणाऱ्या रकमेचे मूल्य निश्चितच खूपच कमी झालेले असेल. महागाईच्या दरामुळे 12000 रुपयाचे मूल्य 25 वर्षानंतर अर्ध्यापेक्षाही कमी झालेले असेल. त्यामुळे इन्शुरन्स कंपन्यांना 25 वर्षानंतर तुमचे प्रीमियम परत करण्यास कोणतीही तोटा सहन करावा लागणार नाही. परंतु पॉलिसी टर्म वाढवल्यामुळे तुमच्यावर मात्र अधिकचे प्रीमियम भरण्याचा भुर्दंड बसतो. तसेच 25 वर्षानंतर पॉलिसी बंद केली तरी मिळणारी रक्कम अत्यंत तुटपुंजी असते. त्यामुळे Zero Cost Term Plan च्या नादात न पडता रेगुलर टर्म प्लॅन व झिरो कॉस्ट टर्म प्लॅन यातील प्रीमियमच्या फरकाची रक्कम SIP द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवली तरी एकूण गुंतवणूक रकमेच्या पाच ते सहा पट नफा मिळू शकतो. समजा 35 वर्षे वयाच्या व्यक्तीला रेगुलर टर्म प्लॅन व झिरो कॉस्ट टर्म प्लॅनमधील प्रीमियममध्ये 500 रुपयाचा फरक पडत असेल आणि त्या व्यक्तीने झिरो कॉस्ट टर्म प्लान न घेता रेगुलर टर्म प्लॅन घेतला व फरकाची 500 रुपये रक्कम दरमहा Index Fund मध्ये 25 वर्षासाठी SIP केली तरी 25 वर्षानंतर 12 टक्के दराने आठ लाख रुपये मिळू शकतात. म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आमच्या WhatsApp Number वर संपर्क साधू शकता.

SIP कालावधी गुंतवणूक परतावा दर परतावा एकूण रक्कम
500 रू 25 वर्षे 150000 12% 798818 948818

झिरो कॉस्ट टर्म प्लॅनचे फायदे

  • Zero Cost Term Plan साठी रेग्युलर टर्म प्लॅनच्या ॲड ऑन रायडर्ससारखे कोणतीही अतिरिक्त प्रीमियम आकारले जात नाही.
  • पॉलिसी बंद करण्याचा निर्णय पॉलिसीधारकावर सोपविलेला असतो त्यामुळे 25 व्या वर्षी पॉलिसी बंधन करता पॉलिसीच्या संपूर्ण कालावधीपर्यंत पॉलिसी सुरू ठेवता येते.
  • तुमची वय जर वीस ते पंचवीस च्या दरम्यान असेल तर चाळीस वर्षे कालावधीसाठी टर्म प्लान घेतलाच पाहिजे वीस ते पंचवीस वर्षे वयाच्या व्यक्तीसाठी झिरो कॉस्ट टर्म प्लॅन एक उत्तम पर्याय आहे.

झिरो कॉस्ट टर्म प्लॅनचे तोटे

  • विमा कंपन्या झिरो कॉस्ट म्हणून मार्केटिंग करत असल्या तरीही हा प्लॅन झिरो कॉस्ट किंवा फ्री नाही.
  • पॉलिसी टर्म वाढत असल्याने जादा प्रीमियम द्यावा लागतो.
  • पॉलिसी बंद केल्यानंतर कंपनीकडून परत मिळणारी रक्कम जीएसटी वगळून असते म्हणजेच जीएसटी फुटी भरलेली रक्कम परत मिळत नाही.
  • एकूण भरलेल्या प्रीमियमची मूल्य पंचवीस वर्षानंतर अर्धी पेक्षा कमी झालेली असते.
  • प्रीमियम वर कोणताही नफा मिळत नाही.

निष्कर्ष

टर्म इन्शुरन्स हा वैयक्तिक वित्तनियोजन Personal Finance मधील एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. टर्म इन्शुरन्स घेण्याचा मुख्य उद्देश म्हणजे तुमच्या पश्चात कुटुंबाची आर्थिक सुरक्षितता करणे हे आहे. त्यामुळे पॉलिसी कालावधी निवडताना वयाच्या 60 ते 65 वर्षापर्यंतचे कव्हर घेतले पाहिजे. यासोबतच टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम आपल्याला परवडेल अशा पॉलिसीची निवड करणे आवश्यक आहे. Zero Cost Term Plan चा पॉलिसी कालावधी किमान 40 वर्षे असल्याने तुम्ही जर 40 वर्षासाठी टर्म इन्शुरन्स घेतला तर तुमचा प्रीमियम वाढण्याची शक्यता जास्त आहे. तसेच झिरो कॉस्ट टर्म प्लॅनच्या अटीनुसार पॉलिसी बंद केल्यानंतर तुम्हाला मिळणारी रक्कम ही प्रीमियम मधून GST वगळून दिलेली असेल. 25 वर्षानंतर मिळणाऱ्या रकमेचे मूल्य हे आज तुम्ही भरत असलेल्या प्रीमियमच्या मूल्यापेक्षा कितीतरी पटीने कमी झालेले असेल. त्यामुळे Zero Cost Term Plan व रेगुलर टर्म प्लॅन यामधील प्रीमियमची तुलना करून तुम्हाला परवडेल असा टर्म इन्शुरन्स घ्यावा. टर्म इन्शुरन्स प्लॅनचे विविध कंपन्यांचे कोटेशन, तुमच्या वयानुसार लागणारा प्रीमियम याविषयी अधिक माहिती हवी असल्यास आमच्या 9579929375 या नंबर वर व्हाट्सअपद्वारे संपर्क करू शकता.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न ( FAQ )

झिरो कॉस्ट टर्म प्लॅनचा पॉलिसी कालावधी किती असतो?

Zero Cost Term Plan चा पॉलिसी कालावधी किमान 40 वर्षे असतो.

झिरो कॉस्ट टर्म प्लॅन मध्ये प्रीमियम परत कधी मिळतात?

Zero Cost Term Plan मध्ये पॉलिसीच्या पंचविसाव्या वर्षी किंवा पॉलिसी धारकाच्या वयाच्या 65 व्या वर्षी यापैकी जे आधी असेल तेव्हा प्रीमियम परत मिळते.

रेगुलर टर्म प्लॅन व झिरो कॉस्ट टर्म प्लॅनमधील फरक काय?

रेगुलर टर्म प्लॅनमध्ये पॉलिसी कालावधी आपल्या सोयीनुसार ठरवता येतो Zero Cost Term Plan मध्ये किमान पॉलिसी कालावधी चाळीस वर्षे असतो किंवा कंपनीद्वारे निश्चित केलेला असतो.

झिरो कॉस्ट टर्म प्लॅन घेणे फायदेशीर आहे का?

आमच्या मते Zero Cost Term Plan च्या तुलनेत रेगुलर टर्म प्लॅन घेणे सोयीस्कर आहे.

टर्म इन्शुरन्स विषयी योग्य माहिती कोठे मिळेल?

टर्म इन्शुरन्स चे कोटेशन, तुमच्या वयानुसार लागणारा प्रीमियम यांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या 9579929375 या नंबर वर व्हाट्सअप द्वारे संपर्क साधावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top