Form 10E Income Tax Calculator : वेतन आयोगाच्या थकबाकीमुळे वाढलेला Income Tax इतका होईल कमी

 

DCPS धारकांसाठी Calculator

सदर Form 10E Income Tax Calculator फक्त सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीसाठी वापरता येईल. मागील आर्थिक वर्षातील वेतन / वेतनाचा काही भाग चालू आर्थिक वर्षात मिळाला तर त्याला आपण थकबाकी मिळाली असे म्हणतो. ही थकबाकी चालू वर्षात मिळाल्यामुळे चालू वर्षीचे एकूण उत्पन्न वाढते. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात Income Tax सुध्दा वाढतो. ही थकबाकी ज्या आर्थिक वर्षांतील आहे त्याच वर्षी मिळाली असती तर त्या त्या वर्षीचे उत्पन्न वाढले असते व त्यानुसार त्या त्या वर्षी Income Tax सुध्दा वाढला असता. तसेच चालू आर्थिक वर्षात थकबाकी मिळाली नसती तर Income Tax कमी झाला असता. त्यासाठीच Form 10E Income Tax Calculator असून चालू आर्थिक वर्षात वेतन आयोगाच्या थकबाकीमुळे वाढलेल्या Income Tax मधून किती सूट मिळू शकते, हे जाणून घेता येते.

Form 10E Income Tax Calculator

Form 10E Income Tax Calculator साठी आवश्यक माहिती

सहाव्या वेतन आयोगानुसार 1/1/2016 चे बेसिक व ग्रेड पे

सातव्या वेतन आयोगानुसार 1/1/2016 चे बेसिक पे – मूळ वेतन

आर्थिक वर्ष 2015-16 मधील करपात्र उत्पन्न

आर्थिक वर्ष 2016-17 मधील करपात्र उत्पन्न

आर्थिक वर्ष 2017-18 मधील करपात्र उत्पन्न

आर्थिक वर्ष 2018-19 मधील करपात्र उत्पन्न

आर्थिक वर्ष 2023-24 मधील करपात्र उत्पन्न

Form 10E Income Tax Calculator कसा वापरावा?

1/1/2016 चे मूळ वेतन

सर्वप्रथम सहाव्या वेतन आयोगानुसार 1/1/2016 चे बेसिक व ग्रेड पे अचूक लिहावे. यानंतर सहाव्या वेतन आयोगानुसार 1/1/2016 चे बेसिक पे येईल. पुढील रकान्यात सातव्या वेतन आयोगानुसार वेतननिश्चिती केल्यावर 1/1/2016 चे बेसिक पे अचूक लिहावे.

1/1/2016 ते 31/12/2019 पर्यंतची थकबाकी

सातवा वेतन आयोग जानेवारी 2016 पासून लागू झाला असला तरी सातव्या वेतन आयोगानुसार प्रत्यक्ष वेतन जानेवारी 2020 पासून मिळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे जानेवारी 2016 ते डिसेंबर 2019 पर्यंतची सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगातील फरकाची थकबाकी एकूण 5 समान हप्त्यात देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचे काही लोकांना 3 हप्ते तर काही लोकांना 4 हप्ते मिळाले आहेत. Form 10E Calculator मध्ये 1/1/2016 चे बेसिक पे टाकल्यावर 1/1/2016 ते 31/12/2019 पर्यंतची थकबाकी आपोआप गणली जाते.

मागील आर्थिक वर्षातील उत्पन्न

Form 10E Income Tax Calculator चा वापर करण्यासाठी आर्थिक वर्ष 2015-16, 2016-17, 2017-18, 2018-19 या चार वर्षातील करपात्र उत्पन्न संबंधित रकान्यात अचूक लिहावे. करपात्र उत्पन्न म्हणजे त्या त्या वर्षातील एकूण उत्पन्नातून सर्व पात्र सूट व कपाती वगळून शिल्लक राहिलेले उत्पन्न होय. करपात्र उत्पन्न Form 16 मधून किंवा Income Tax Return मधून लिहावे.

चालू वर्षातील उत्पन्न

चालू आर्थिक वर्षातील म्हणजेच आर्थिक वर्ष 2023-24 मधील करपात्र उत्पन्न अचूक लिहावे. करपात्र उत्पन्न म्हणजे Taxable Income होय.

 निवडलेली करपद्धती व मिळालेले हप्ते

आर्थिक वर्ष  2023-24 मध्ये निवडलेली करपद्धती Old tax regime Vs New tax regime यापैकी अचूक निवडावे. तसेच सातव्या वेतन आयोगाचे किती हप्ते मिळाले ते अचूक निवडावे. यानंतर Next बटनवर टच करावे.

Form 10 E

Next बटनवर टच केल्याबरोबर पुढील पानावर Form 10 E दिसेल. Form 10 E मध्ये एकूण 8 मुद्दे असून सर्व आकडे आपोआप आलेले असतील.

1. Total income (excluding salary received in arrears or advance)

यामध्ये आर्थिक वर्ष 2023-24 मधील थकबाकी वगळून असलेले करपात्र उत्पन्न आहे. म्हणजेच थकबाकी मिळाली नसती तर एवढे उत्पन्न आले असते.

2. Salary received in arrears or advance

यामध्ये आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये मिळालेली सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीची रक्कम आहे.

3. Total income (as increased by salary received in arrears or advance) [Add item 1 and item 2]

यामध्ये वरील 1 व 2 ची बेरीज करून आलेली रक्कम येईल. ही रक्कम थकबाकी सह आहे.

4. Tax on total income [as per item 3]

वरील मुद्दा क्र.3 वर तुम्ही निवडलेल्या करपद्धतीनुसार आयकराची गणना केलेली आहे. म्हणजेच आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये तुम्हाला द्यावा लागत असलेला एकूण आयकर होय.

5. Tax on total income [as per item 1]

यामध्ये मुद्दा क्र 1 वर म्हणजेच थकबाकी वगळून शिल्लक असलेल्या करपात्र उत्पन्नावर तुम्ही निवडलेल्या करपद्धतीनुसार आयकराची गणना केलेली आहे. म्हणजेच आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये थकबाकी मिळाली नसती तर इतका आयकर द्यावा लागला असता.

6. Tax on salary received in arrears or advance [Difference of item 4 and item 5]

यामध्ये आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये मिळालेल्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीवर तुम्ही निवडलेल्या करपद्धतीनुसार आयकराची गणना केलेली आहे.

7. Tax computed in accordance with Table “A” [Brought from column 7 of Table A]

यामध्ये आलेली रक्कम ही मागील 4 आर्थिक वर्षातील करपात्र उत्पन्न व थकबाकीचा आर्थिक वर्ष 2015-16, 2016-17, 2017-18, 2018-19 या वर्षातील हिस्सा यांची गणना करून आलेली आहे.

8. Relief under Section 89(1) [Indicate difference between the amounts mentioned against item 6 and item 7]

ही रक्कम म्हणजेच आर्थिक वर्ष 2023-24 मधील एकूण आयकरातून Section 89(1) अंतर्गत मिळत असलेली सूट होय. ही सूट घेण्याकरिता Income Tax Return भरण्याआधी Form 10E  भरणे आवश्यक आहे. आयकर विभागाच्या वेबसाईट वर Form 10E  online भरावा लागतो. त्याशिवाय Income Tax Return मध्ये Section 89(1) अंतर्गत मिळत असलेली सूट दिली जात नाही.

सारांश

थकबाकी मिळाल्यामुळे आयकर वाढतो. वाढलेला आयकर कमी करण्यासाठी आयकर कायद्यातच Section 89(1) अंतर्गत सूट देण्याचे प्रावधान आहे. Form 10E Income Tax Calculator r द्वारे Section 89(1) अंतर्गत तुम्हाला किती सूट मिळू शकते याची गणना करता येते.

Form 10E Income Tax Calculator विषयी आपले अभिप्राय अवश्य द्यावे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top