9 वर्षांपासून नियमित सुरु असलेली PLI Surrender करुन मी चूक केली का? या प्रश्नाचे उत्तर हा लेख वाचल्यानंतर तुम्ही द्याल अशी अपेक्षा आहे. इयत्ता 9 वी पासून सध्या आर्थिक शिक्षणाची तोंडओळख करून देण्यास सुरूवात झाली आहे. पाच सात वर्षाआधी शालेय शिक्षण आणि आर्थिक शिक्षण याचा काडीचाही संबंध नव्हता. त्यामुळे व्यक्ती कमावती झाल्यावर पहिल्या दिवसापासून पगार/ वेतन तर मिळते परंतु त्याचा योग्य वापर कसा करावा, हे मात्र अनुभवानेच हळूहळू लक्षात येते. काही लोकांच्या बाबतीत हे लक्षात येता येता वेळही निघून गेलेली असते. एखादी गोष्ट आपल्याला माहित नसेल आणि ती गोष्ट आपल्या हातून घडली तर त्याला आपली चूक म्हणता येणार नाही, परंतु दुसरी गोष्ट त्यापेक्षाही अधिक चांगली आहे हे कालांतराने लक्षात आल्यावर आपली चूक सुधारणे मात्र आपल्याच हातात आहे. मी नोकरीला लागल्यानंतर पहिल्यांदा Postal Life Insurance Policy (PLI) मार्च 2014 मध्ये काढली.
PLI Surrender विषयी माहिती
पॉलिसीचे नाव – EA Santosh
विमा रक्कम – 5 लाख
पॉलिसी कालावधी – 31 वर्षे
मासिक हप्ता – 1175 + GST 26 = ₹ 1201/- रुपये
पॉलिसी सुरू केल्याची तारीख – 26/03/2014
PLI Surrender केल्याची तारीख – 14/10/2023
भरलेले एकूण मासिक हप्ते – 116
भरलेली एकूण रक्कम – 1,39,000/- रुपये
PLI surrender केल्यानंतर मिळालेली रक्कम – 1,22,305/- रुपये
PLI Surrender केली नसती तर…
परिपक्वता लाभ – Maturity Benefit
विमा रक्कम – 5,00,000/- रुपये
बोनस – 8,06,000/- रुपये
टर्मिनल बोनस – 1,000/- रुपये
परीपक्वता रक्कम – 13,07,000/- रुपये
एकूण मासिक हप्ते – 372
भरावी लागणारी एकूण रक्कम – 4,46,772/- रुपये
PLI चे सर्व 372 हप्ते नियमित भरल्यास म्हणजे एकूण 4,46,772/- रुपये प्रीमिअम देऊन सन 2045 मध्ये मला वरीलप्रमाणे परिपक्वता लाभ – Maturity Benefit 13,07,000/- रुपये मिळाले असते.
PLI Loan
मला पैशांची अत्यंत गरज असती आणि PLI पॉलिसी बंद करण्याची इच्छा नसती तर मी PLI पॉलिसीवर Loan घेऊन आपली गरज भागविली असती. परंतु PLI surrender करण्यामागे पैशांची अत्यंत गरज आहे, हे कारण नव्हतेच.
मृत्यू लाभ
पॉलिसी कालावधीत मृत्यू झाल्यास विमा रक्कम 5 लाख रुपये व एकूण भरलेल्या प्रिमियमवर बोनस मिळाला असता. असे असतानाही मी PLI Surrender करण्याचा निर्णय घेतला.
PLI Surrender करण्याची प्रमुख कारणे
अपुरी विमा रक्कम
आजच्या आणि भविष्यातील महागाईच्या तुलनेत पॉलिसी धारकाच्या मृत्यू पश्चात मिळणारी PLI मधील 5 लाख रुपये + बोनस ही विमा रक्कम अपुरी आहे.
महागाईच्या दरावर मात न करणारी Maturity Benefit
1201 रू मासिक प्रीमिअम 372 महिने भरून म्हणजेच एकूण 446772 रू गुंतवणूक करून सन 2045 साली 1307000/- रूपये ही maturity benefit म्हणून रक्कम मिळेल. परंतु सन 2045 मधील 1307000 चे मूल्य हे आजच्या तुलनेत खालील Present Value Calculator ने काढता येईल.
एकंदरीत PLI पॉलिसी मध्ये गुंतवणुक व विमा या दोन्ही गोष्टी एकत्र असल्याने विमा सुद्धा कमी रकमेचा मिळतो तसेच गुंतवणुकीतून मिळणारा लाभ सुद्धा अत्यंत तुटपुंजा आहे.
वरील सर्व बाबींची माहिती PLI पॉलिसी काढतेवेळी नव्हती.
PLI पॉलिसी वरील उत्तम पर्याय
गुंतवणूक व विमा या दोन्ही गोष्टीचा स्वतंत्रपणे विचार केल्यास गुंतवणुकीसाठी Mutual Fund हे साधन अत्यंत उत्तम असल्याचे लक्षात आले. तसेच जीवन विम्यासाठी Term Insurance हा उत्तम पर्याय असल्याचे लक्षात आले.
Mutual Fund मधील गुंतवणूक
9 वर्षानंतर PLI Surrender केल्यानंतर मिळालेली रक्कम 1,22,000 /- रुपये एकरकमी PLI पॉलीसीच्या उर्वरित कालावधीसाठी म्हणजेच एकूण 21 वर्षांसाठी Mutual Fund मध्ये गुंतवल्यास सन 2045 मध्ये मिळणारी रक्कम खालील Lumpsum Calculator चा वापर करून काढता येईल. Mutual Fund मधील गुंतवणुकीवर सरासरी 12% परतावा गृहीत धरून मिळणारी एकूण रक्कम काढूया.
ही रक्कम जवळपास PLI मध्ये मिळणाऱ्या 13,07,000/- रुपये या रकमेइतकीच असेल.
Term Insurance
पॉलिसीचे नाव – Max Life Term Insurance
विमा रक्कम -1 करोड
पॉलिसी कालावधी – 44 वर्षे
मासिक हप्ता – ₹ 1313 /- रुपये
पॉलिसी सुरू केल्याची तारीख – 26/07 /2021
विमा कवच लागू असल्याची मुदत – 26/07 /2065
हेही अवश्य वाचा : टर्म इन्शुरन्स कसा विकत घ्यावा?
Term Insurance मधील 1 करोडचा विमा सुद्धा PLI मधील 5 लाख रुपये विम्याच्या 20 पट आहे. तसेच PLI मधील 5 लाखांचा विमा हा फक्त सन 2045 पर्यंतच लागू राहील. परंतु Term Insurance मधील 1 करोडचा विमा हा सन 2065 पर्यंत लागू असेल. एवढेच नव्हे तर Term Insurance मध्ये भरलेला प्रीमिअम परत मिळण्याची सुविधा सुद्धा वयाच्या 72 वर्षानंतर उपलब्ध आहे. घडून गेलेल्या घटनेवर जर तर चा विचार करून आता काहीच फायदा नाही. त्यामुळे आपल्या हातून चूक झाली हे लक्षात आल्यामुळे मी PLI surrender करण्याचा निर्णय घेतला. एकंदरीत PLI च्या तुलनेत Mutual Fund आणि Term Insurance मधील गुंतवणूक कधीही फायद्याची आहे.
हा लेख कसा वाटला याबद्दल आपले अभिप्राय कमेंटमध्ये अवश्य द्या. या लेखाविषयी आपले काही प्रश्न , शंका असतील तर आम्हाला 9579929375 या नंबरवर संपर्क साधू शकता.
FAQ
मी PLI surrender केल्यास काय होईल?
कोणतीही पॉलिसी सरेंडर करणे नेहमीच नुकसान असते.
मी PLI प्रीमियम भरणे थांबवल्यास काय होईल?
3 वर्षांच्या आतील pli चा 6 महिने हप्ता भरला नाही आणि 3 वर्षांपेक्षा जास्त काळ सुरु असलेल्या pli चा 12 महिने हप्ता भरला नाही तर PLI पॉलिसी बंद पडते.
पोस्टल लाइफ इन्शुरन्स 80c अंतर्गत येतो का?
होय
पोस्टल लाइफ इन्शुरन्समध्ये EA म्हणजे काय?
EA म्हणजे एंडॉवमेंट ॲश्युरन्स पॉलिसी . त्याला संतोष या नावानेही ओळखले जाते. ही गुंतवणूक आणि जीवन विमा पॉलिसी आहे. ही एक जीवन विमा पॉलिसी आहे जिथे तुम्ही पूर्व-निर्धारित मुदतपूर्ती तारखेपर्यंत पोहोचता तेव्हा तुम्हाला मॅच्युरिटी रक्कम (विमा रक्कम आणि जमा बोनसची रक्कम) दिली जाईल.