Present Value Calculator Marathi
Present Value Calculator Marathi ने आपण भविष्यात मिळणाऱ्या कोणत्याही रकमेचे सध्याचे मूल्य जाणून घेऊ शकतो. सगळ्याच गुंतवणूक योजनांमध्ये आपल्याला भविष्यात मिळणारी रक्कम सांगितली जाते. आजच्या घडीला जरी ही रक्कम खूप मोठी वाटत असली तरी 25 – 30 वर्षानंतर हीच रक्कम तुम्हाला तेवढी मोठी वाटणार नाही. याचे महत्त्वाचे कारण आहे महागाईचा वाढत जाणारा दर. म्हणजेच आज आपल्यापासून घेतलेले 10000 रु एखाद्याने 25 वर्षानंतर 10000 रुपयेच परत केले तर यात आपले खूप मोठे नुकसान झालेले असेल. कारण आज 10000 रुपयात मिळणाऱ्या वस्तू तुम्हाला 25 वर्षानंतर 10000 रुपयात मिळणार नाही, त्याच वस्तूची किंमत खूप वाढलेली असेल.
Present Value Calculator Marathi चा वापर कसा करावा?
Present Value Calculator चा वापर करण्यासाठी मुख्य 3 गोष्टींची गरज आहे.
- गुंतवणूक रक्कम
- महागाईचा दर
- गुंतवणुकीचा कालावधी