Arthavahini.com या ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. एक पाऊल आर्थिक साक्षरतेकडे हे आमचे ब्रीद आहे. आर्थिक साक्षरता हा आजच्या काळात एक महत्त्वाचा विषय आहे. हा दैनंदिन जीवनाशी निगडित घटक असला तरी बरेचसे लोक याबाबत अनभिज्ञ आहेत. दररोज वर्तमानपत्रातून आर्थिक फसवणुकीच्या घटना प्रसंग प्रसिद्ध होत असतात. याचे प्रमुख कारण आर्थिक साक्षरता नसणे हे होय. आपल्या आर्थिक उत्पन्नाचे योग्य नियोजन नसल्यामुळे ही आपल्याला अनेकदा आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळेच मराठी भाषिक लोकांना आर्थिक साक्षर बनवण्यासाठी Arthavahini.com या ब्लॉगची निर्मिती करण्यात आली आहे.
Personal Finance
इंटरनेट म्हणजे माहितीचे महाजाल होय. आपल्याला हवी ती माहिती आपण इंटरनेट वर शोधू शकतो. व्यक्तीच्या सर्व प्रकारच्या आर्थिक बाबींसाठी इंग्रजीमध्ये Personal Finance ही संज्ञा वापरली जाते. Personal Finance याला मराठीमध्ये वैयक्तिक वित्त/ वित्तनियोजन म्हणता येईल. Personal Finance मध्ये प्रामुख्याने उत्पन्न, खर्च, गुंतवणुक, करनियोजन, विमा, कर्ज यासारख्या आर्थिक बाबींचा समावेश होतो. या सर्व बाबींविषयी मराठी वाचकांना योग्य मार्गदर्शन एकाच ठिकाणी देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
व्यावहारिक दृष्टिकोनातून काही ठिकाणी इंग्रजी संज्ञा – नावाचा वापर केला आहे. इंग्रजी नावांसोबतच आवश्यक तेथे मराठी अनुवाद दिलेला आहे. या ब्लॉग वरील आपल्या सूचना, प्रतिक्रिया आम्हाला admin@arthavahini.com वर अवश्य कळवा.
आपणा सर्वांना अर्थसाक्षर होण्यासाठी हार्दिक शुभेच्छा!