Group Personal Accident Insurance : 15 लाखाचा पोस्टाचा अपघात विमा केवळ वार्षिक 755 रुपयात

Group Personal Accident Insurance प्रत्येकाकडे असणे आवश्यक आहे. कारण अपघात हा अनपेक्षितपणेच घडत असतो. बरेचदा दुसऱ्यांच्या चुकीमुळे अपघात घडल्याच्या घटना घडत असतात. पोलिसांच्या दंडाच्या भीतीने बरेच लोक इच्छा नसतानाही आपल्या वाहनांचा विमा काढतात. परंतु आपले जीवन अमूल्य असूनही आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये वैयक्तिक विम्याविषयी (Term Insurance, Health Insurance, Accident Insurance) कमालीचे औदासिन्य दिसून येते. आज आपण Group Personal Accident Insurance पॉलिसी विषयी जाणून घेऊया, या पॉलिसीचा खर्च प्रतिदिन केवळ 2 रुपये आहे. परंतु एखादेवेळी अनपेक्षित घटना घडल्यास ही पॉलिसी खूप उपयुक्त ठरू शकते.

Group Personal Accident Insurance

Group Personal Accident Insurance – समूह वैयक्तिक अपघात विमा

Group Personal Accident Insurance प्रत्येकाकडे असणे आवश्यक आहे. हा एखाद्या संस्थेकडून आपल्या सदस्यांना दिला जातो. अपघातामुळे झालेला वैद्यकीय खर्च, कायमचे अपंगत्व, मृत्यू तसेच त्यानुषंगाने झालेले उत्पन्नाचे नुकसान यापासून सदस्याचे किंवा त्याच्या कुटुंबाचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी हा विमा असतो.

15 लाखाचा पोस्टाचा अपघात विमा केवळ 755 रुपयात

विमा रक्कम

पोस्टाच्या समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेमध्ये 10 लाख व 15 लाख विमा असलेली पॉलिसी घेता येते.

कालावधी

सदर पॉलिसीची मुदत 1 वर्षांची आहे.

विमा हप्ता – Premium

10 लाखाची पॉलिसी वार्षिक 521 रुपये तर 15 लाखाची पॉलिसी वार्षिक 755 रुपयामध्ये मिळते.

Mutual Fund SIP सुरु करण्यासाठी येथे क्लिक करा.

पॉलिसी कशी घ्यावी?

ही पॉलिसी फक्त पोस्ट ऑफिसमध्येच मिळेल. पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही शाखेत केवळ 5 ते 10 मिनिटात ही पॉलिसी काढता येते.

आवश्यक कागदपत्रे

ही पॉलिसी काढण्यासाठी तुमच्याकडे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे IPPB बचत खाते असणे अनिवार्य आहे. आधार संलग्न मोबाईल नंबर असल्यास लगेच IPPB बचत खाते काढता येते.

पोस्टाच्या समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेची वैशिष्ट्ये

अनपेक्षितपणे घडलेल्या अपघातामुळे पॉलिसीधारकाचे किंवा त्याच्या कुटुंबाचे झालेले आर्थिक नुकसान भरून काढणे किंवा आर्थिक सहकार्य करणे हेच या पॉलिसीचे मूळ वैशिष्ट्य आहे. या पॉलिसीचे लाभ पुढीलप्रमाणे आहेत

अपघाती मृत्यू

अपघातामुळे 365 दिवसाच्या आत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास 15 लाख रुपये

अपघाती कायम पूर्ण अपंगत्व

अपघातामुळे कायमचे पूर्ण अपंगत्व आल्यास 15 लाख रुपये

अपघाती कायम अंशतः अपंगत्व

अपघातामुळे कायमचे अंशतः अपंगत्व आल्यास 15 लाख रुपयापर्यंत

वैद्यकीय खर्च

अपघातामुळे झालेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती 1 लाख रुपये

Daily Cash benefit

अपघातामुळे दवाखान्यात भरती राहावे लागल्यास 1000 रुपये प्रति दिवस (जास्तीत जास्त 15 दिवसांसाठी)

ICU Cash benefit

अपघातामुळे ICU मध्ये राहावे लागल्यास प्रति दिवस 2000 रुपये (जास्तीत जास्त 15 दिवसांसाठी)

Deductible

अपघातामुळे दवाखान्यात भरती राहावे लागल्यास पहिल्या 2 दिवसांचा खर्च कंपनीकडून मिळणार नाही. त्यानंतरचा खर्च वरील मुद्द्यांच्या अधीन राहून कंपनी देईल.

कोमा स्थिती असल्यास

अपघातामुळे पॉलिसीधारक कोमामध्ये गेल्यास सुरुवातीचे ३ महिने वगळून त्यानंतरच्या 10 आठवड्यापर्यंत 15000 रुपये प्रति आठवडा

हाडे तुटल्यास

अपघातामुळे हाडे तुटल्यास 25000 रुपयेपर्यंत

जळणे

अपघातामुळे जळाल्यास 1 लाख रुपये

मुलांचे शिक्षण

अपघाती मृत्यू झाल्यास मुलांच्या शिक्षणासाठी 1 लाख रुपये

मुलांचे लग्न

अपघाती मृत्यू झाल्यास मुलांच्या लग्नासाठी 1 लाख रुपये

Annual Health Checkup

वर्षातून एकदा आरोग्य तपासणी मोफत

सारांश

Group Personal Accident Insurance प्रत्येकाकडे असणे आवश्यक आहे. कारण हा विमा अत्यल्प खर्चात सहजतेने कुठल्याही पोस्ट ऑफिसमध्ये मिळतो. वार्षिक 755 रुपये च्या तुलनेत 15 लाखाचा अपघात विमा सर्वाना परवडणारा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top