Health Insurance Checklist : आरोग्य विमा घेताना आवर्जून पाहाव्या या 12 बाबी

सध्या भारतात Health Insurance देणाऱ्या 30 कंपन्या आहेत. या कंपन्यांचे शेकडो plans उपलब्ध आहेत, त्यामुळे साहजिकच नवीन व्यक्ती Health Insurance Policy घेताना गोंधळून जातो आणि सहजच एक प्रश्न हमखास विचारतो, “सर्वात चांगली Health Insurance Policy  कोणती ?” फक्त एका पॉलिसीचे नाव सांगून या प्रश्नाचे उत्तर देता येणार नाही. परंतु चांगल्या Health Insurance Policy ची वैशिष्ट्ये मात्र नक्कीच सांगता येईल. तर आपण जाणून घेऊया, आरोग्य विमा खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवावयाच्या 12 महत्त्वपूर्ण गोष्टी….health insurance checklist

Health Insurance Checklist 

आरोग्य विम्याच्या अटी व शर्ती क्लिष्ट असतात. त्यामुळे आरोग्य विमा घेताना सर्व बारीक सारीक गोष्टी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आरोग्य विमा घेताना खालील Health Insurance Checklist महत्त्वाची आहे.

1. Room Rent Limit 

Hospital मध्ये General Ward, sharing room, AC room, Deluxe room, Luxury room अशा अनेक प्रकारच्या खोल्या असतात. Single Private AC room किंवा room rent वर कोणतीही मर्यादा नसलेली पॉलिसी घेणे सोयीस्कर आहे. 

2. Co-Pay 

 काही पॉलिसींमध्ये 10%, 20% Co-Pay असते. म्हणजे क्लेमच्या वेळी तेवढी रक्कम तुम्हाला भरणे आवश्यक असते. आरोग्य विमा घेताना Co-Pay नसलेली पॉलिसी घ्यावी म्हणजेच क्लेमची संपूर्ण रक्कम विमा कंपनी देईल.

3. Day Care Procedure चा समावेश 

ज्या उपचारासाठी/शस्त्रक्रियेसाठी पूर्वी 2-3 दिवस दवाखान्यात भरती राहावे लागत होते, परंतु आता तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे त्या शस्त्रक्रिया/उपचार 24 तासांच्या आत पूर्ण केल्या जातात, त्यांना Day Care Procedure म्हणतात. उदा. मोतीबिंदू, डायलिसीस, मुतखडा, किमोथेरपी, इत्यादी. आरोग्य विमा पॉलिसीमध्ये सर्व  Day Care Procedure चा समावेश असावा.

4. Disease Wise Sublimit नसावी 

काही पॉलिसीमध्ये ठराविक आजाराच्या उपचारावर विशिष्ट रकमेची मर्यादा असते. म्हणजे तुम्ही जरी 5 लाखाचा आरोग्य विमा घेतलेला असला तरी पॉलिसीमध्ये जर रोबोटिक सर्जरीची मर्यादा 2 लाख असेल तर रोबोटिक सर्जरीसाठी विमा कंपनी 2 लाखापर्यंत क्लेम देऊ शकेल. त्यापेक्षा जास्त बिल असल्यास ते तुम्हाला जवळून द्यावे लागेल. म्हणून तुम्ही घेत असलेल्या आरोग्य विमा पॉलिसीमध्ये Disease Wise Sublimit नसावी.

5. Pre – Post Hospitalization Cover

दवाखान्यात admit होण्यापूर्वी व discharge मिळाल्यानंतरही कधीकधी बऱ्याच आरोग्य तपासण्या, रक्त चाचण्या, X – ray, CT scan, USG, औषधोपचार करावे लागतात. त्यामुळे प्रत्यक्ष admit होण्यापूर्वीचा व discharge नंतरचा खर्चही खूप असतो. म्हणून आरोग्य विमा  पॉलिसीमध्ये हॉस्पिटलायझेशनपूर्वी 60 दिवसांचे कव्हर आणि रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 180 दिवसांचे कव्हर असणे आवश्यक आहे.

6. Restoration benefit

तुम्ही 5 लाखाचा विमा घेतला असेल आणि एखाद्या उपचाराचे 3 लाख रु बिल कंपनीने दिल्यास त्या वर्षात तुमच्याकडे फक्त 2 लाखाचे कव्हर शिल्लक राहील. पण तुमच्या पॉलिसीमध्ये Restoration benefit असेल तर तुमचे कव्हर पुन्हा Restore होऊन 5 लाख रु होईल. काही कंपन्या हे  Restore झालेले कव्हर आधीच्या रुग्णाला त्याच आजारासाठी देत नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही आजारासाठी अमर्यादित Restoration benefit देत असलेली  पॉलिसी उत्तम समजावी.

7. Long Life Renewal

Group Health Insurance Policy कधीही बंद केल्या जाऊ शकतात किंवा अटी व शर्ती बदलल्या जाऊ शकतात. म्हणून Health Insurance Policy आयुष्यभर renew करता येणारी असावी.

8. No Claim Bonus

एखाद्या वर्षी पॉलिसीमध्ये तुमचा क्लेम आला नाही तर विमा कंपनीकडून तुम्हाला No Claim Bonus दिले जाते. म्हणजे पुढील वर्षी Renewal च्या वेळी तुमचे कव्हर वाढवून दिले जाते. काही कंपन्या दरवर्षी 50% ते 100% पर्यंत No Claim Bonus देतात. आरोग्य विमा घेताना चांगला No Claim Bonus देणारी policy घ्यावी.

9. Hospital Network 

कॅशलेस क्लेमसाठी नेटवर्क हॉस्पिटल तपासणे खूप महत्वाचे आहे. एखाद्या हॉस्पिटलने आपल्या ग्राहकांना कॅशलेस हॉस्पिटलायझेशन सुविधा देण्यासाठी विमा कंपनीशी करार केला असेल तर ते नेटवर्क हॉस्पिटल मानले जाते. नॉन-नेटवर्क हॉस्पिटल कॅशलेस उपचार देत नाही आणि अशा हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यास , डिस्चार्जच्या वेळी ग्राहकांना हॉस्पिटलचे संपूर्ण बिल भरावे लागते. तथापि, नॉन-नेटवर्क हॉस्पिटलमध्ये झालेला वैद्यकीय खर्च विमा कंपनीकडून परतफेड केला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही घेत असलेल्या आरोग्य विमा कंपनीचे तुमच्या परिसरातील रुग्णालयांचे नेटवर्क नेहमी तपासा. 

10. Consumable Items Cover 

बँडेज, हातमोजे, फेस मास्क, पीपीई किट, आयव्ही, सर्जिकल टेप, वैद्यकीय उपकरणे आणि संरक्षणात्मक उपकरणे यासारख्या विविध गोष्टी वैद्यकीय उपचारादरम्यान वापरण्यात येतात. यांना Consumable Items  म्हणतात. या वस्तूंची रक्कम एकूण हॉस्पिटल बिलाच्या 5-20% असू शकते. बऱ्याच पॉलिसीमध्ये Consumable Items कव्हर होत नाहीत, त्यासाठी वेगळे Rider घ्यावे लागते. 

11. Pre Existing Diseases

आरोग्य विमा खरेदी करताना तुम्हाला आधीपासून काही आजार असेल तर अशा आजारासाठी कंपनी पहिल्या दिवसापासून कव्हर देत नाही. असे आजार बरेच पॉलिसीमध्ये तीन वर्षानंतर कव्हर होतात. उदा. बीपी, शुगर, अस्थमा, थायरॉईड, इत्यादी. काही विमा कंपन्या अशा आजारांना पहिल्या दिवसापासून कव्हर देण्यासाठी किंवा तीन वर्षांचा प्रतीक्षा कालावधी कमी करण्यासाठी अतिरिक्त प्रीमियम घेतात. म्हणून आरोग्य विमा घेताना जर तुम्हाला आधीपासून काही आजार असेल तर प्रतिक्षा कालावधी तपासून घ्यावा.

12. Insurance Agent 

आरोग्य विमा थेट विमा कंपनीकडून किंवा पॉलिसी बाजार सारख्या कंपनी कडून खरेदी करता येतो. परंतु आरोग्य विमा खरेदी करण्यासाठी एक चांगला एजंट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे विमा कंपनीने तुमचा क्लेम नाकारल्यास तुम्हाला एका चांगल्या सल्लागाराची गरज पडू शकते.

तुम्ही ही पॉलिसी कधी खरेदी करावी?

शक्य तितक्या कमी वयात आरोग्य विमा घेणे फायद्याचे ठरते. कारण आजच्या जीवनशैलीमुळे कुणालाही आजार होण्याचा धोका कुणीही नाकारू शकत नाही. आजार झाल्यानंतर आरोग्य घेण्याचा विचार करत असाल तर त्यावेळी विमा कंपनी तुम्हाला आरोग्य विमा देऊ शकणार नाही किंवा अतिरिक्त प्रीमियम आकारू शकते.

हा लेख आवडल्यास इतरांसह शेअर करायला विसरू नका. Health Insurance Checklist बाबत आणखी माहिती हवी असल्यास आम्हाला संपर्क करू शकता. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top