Income Tax Calculator FY 2023-24
सदर Income Tax Calculator FY 2023-24 च्या मदतीने 60 वर्षांखालील शासकीय कर्मचारी सहजरीत्या आपला Income Tax काढू शकतात. एवढेच नव्हे तर Old Tax Regime Vs New Tax Regime मधील फरक सुद्धा काढू शकतात.
Income Tax Calculator FY 2023-24 चा वापर कसा करावा ?
हे Income Tax Calculator FY 2023-24 सर्वाना सहजरीत्या वापरता येईल. त्यासाठी खालील टप्पे महत्वाचे आहे.
उत्पन्नाची साधने
शासकीय कर्मचाऱ्याचे उत्पन्नाचे मुख्य साधन म्हणजे त्याला मिळणारा पगार होय. तसेच उत्पन्नाचे इतरही साधने असू शकतात.
पगारातून मिळणारे उत्पन्न – Gross Income
यामध्ये तुम्हाला वर्षभरात मिळणाऱ्या एकूण पगाराची रक्कम टाकावी. यामध्ये पगारासोबातच मिळालेली मागील महागाई भत्ता थकबाकी तसेच सातव्या वेतन आयोगाची थकबाकी यांचा सुद्धा समावेश करावा. यामधून कोणतीही कपात वजा करू नये.
अन्य स्त्रोताद्वारे उत्पन्न
यामध्ये तुम्हाला पगाराव्यतिरिक्त मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या इतर उत्पन्नाची रक्कम टाकावी.
आयकरातून सूट असलेल्या बाबी – Exemptions & Deductions
Income tax च्या Old Vs New Tax Regime मध्ये वेगवेगळ्या सूट व कपातीचा लाभ तुम्ही घेऊ शकता. Income Tax Calculator FY 2023-24 चा वापर करताना एकूण उत्पन्नातून या सूट व कपाती वजा केल्या जाते.
प्रमाणित सूट – Standard Deduction
इन्कम टॅक्सच्या जुन्या व नव्या अशा दोन्ही करप्रणाली मध्ये 50000 रुपयाची प्रमाणित सूट लागू आहे. ही सूट सरसकट 50000 रुपये असल्यामुळे आधीच लिहिलेली आहे.
व्यवसाय कर – Professional Tax
Income Tax old tax regime मध्ये 2500 रुपये पर्यंत व्यवसाय करास सूट आहे.
घरभाडे भत्ता सूट – HRA exemption
घरभाडे भत्ता शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगाराचा एक भाग आहे. सध्या मूळ वेतनाच्या 9 टक्के घरभाडे भत्ता मिळतो. Old tax regime मध्ये घरभाडे भत्ता सूट लागू आहे. परंतु कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या संपूर्ण घरभाडे भत्ता सूट प्राप्त नसून विशिष्ट सूत्र वापरून घरभाडे भत्त्याची सूट रक्कम काढली जाते. घरभाडे भत्ता सूट काढण्यासाठी HRA calculator चा वापर करावा.
गृह कर्जावरील व्याज – Interest on home Loan
गृह कर्जावर भरलेल्या व्याजाची दोन लाख रुपये पर्यंतची रक्कम टॅक्स मधून करमुक्त आहे. ही रक्कम बँकेकडून प्राप्त झालेल्या Interest Certificate नुसार भरावी.
80C अंतर्गत सूट
या अंतर्गत शासकीय कर्मचाऱ्यांनी केलेली विविध प्रकारची गुंतवणूक करमुक्त आहे. यामध्ये प्रामुख्याने GPF, NPS कर्मचारी हिस्सा, पब्लिक प्रॉडक्ट फंड, सुकन्या समृद्धी, योजना पाच वर्षांसाठीची फिक्स डिपॉझिट, इक्विटी लिंक सेविंग स्कीम ELSS, LIC, PLI, UPLIP, Term Insurance, Tution fees, गट विमा, गृह कर्जाची मुद्दल यासारख्या बाबी येतात. 80C अंतर्गत कमाल मर्यादा 150000 रुपये आहे. त्यामुळे तुमची 80 सी अंतर्गत येणारी गुंतवणूक दीड लाख रुपये पेक्षा जास्त असली तरीही तुम्हाला फक्त दीड लाख रुपये पर्यंतचीच सूट मिळते.
NPS शासन हिस्सा
यामध्ये कर्मचाऱ्याला मिळालेला NPS चा संपूर्ण शासन हिस्सा रक्कम टाकावी. ही रक्कम म्हणजेच मूळ पगार व महागाई भत्ता यांच्या 14% असते.
80D Medical Insurance
या कलमांतर्गत 60 वर्षाखालील कर्मचाऱ्यांनी त्याच्या कुटुंबासाठी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतल्यास 25000 रुपये पर्यंतचा प्रीमियम करमुक्त आहे. 60 वर्षावरील पालकांसाठी 50000 रुपये पर्यंतची रक्कम करमुक्त आहे. या कलमांतर्गत कमाल 75000 रुपये पर्यंतची रक्कम करमुक्त आहे.
80G देणगी
यामध्ये तुम्ही दिलेली देणगी ची रक्कम टाकावी. शासकीय संस्थेला दिलेली देणगी 100 टक्के करमुक्त आहे तर खाजगी संस्थेला दिलेली देणगी 50 टक्के पर्यंत करमुक्त आहे.
80E उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज
मुलांच्या उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजाची रक्कम या ठिकाणी टाकावी.
80U दिव्यांगासाठी सूट
जर तुम्ही दिव्यांग असाल तर होय या पर्यायावर टिक करा अन्यथा तसेच राहू द्या. होय या पर्यायावर टिक केल्यास 75 हजार रुपये सूट मिळते.
यानंतर Next या बटनवर क्लिक करावे.
करपात्र उत्पन्न व देय आयकर – Taxable Income and Payable Tax
तुम्ही भरलेल्या उत्पन्न व कपाती यांच्या माहितीच्या आधारे Income Tax Calculator FY 2023-24 ने तुमचे करपात्र उत्पन्न काढलेले आहे. त्यानुसार तुम्हाला देय असलेली Income Tax ची रक्कम काढली आहे.
करपात्र उत्पन्न – Taxable Income – Old Tax Regime
तुम्ही भरलेल्या उत्पन्नातून जुन्या करप्रणालीनुसार लागू असलेल्या सूट व कपाती यांची रक्कम वजा करून करपात्र उत्पन्न काढले आहे.
देय आयकर – Payable Tax – Old Tax Regime
Old Tax Regime मधील Tax Slab नुसार इन्कम टॅक्सची रक्कम काढलेली आहे. ही रक्कम 4 टक्के सेस सहित आहे.
करपात्र उत्पन्न – Taxable Income – New Tax Regime
तुम्ही भरलेल्या उत्पन्नातून नव्या करप्रणालीनुसार लागू असलेल्या सूट व कपाती यांची रक्कम वजा करून Income Tax Calculator FY 2023-24 ने करपात्र उत्पन्न काढले आहे.
देय आयकर – Payable Tax – New Tax Regime
New Tax Regime मधील Tax Slab नुसार इन्कम टॅक्स ची रक्कम काढलेली आहे. ही रक्कम 4 टक्के सेस सहित आहे.
Old Tax Regime व New Tax Regime मधील फरक
यामध्ये तुमच्या उत्पन्न व कपातीच्या आधारे दोन्ही कर प्रणाली मध्ये इन्कम टॅक्स मधील फरकाची रक्कम काढलेली आहे.
Income Tax Calculator FY 2023-24 चा वापर करून तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्हाला परवडत असलेली Old Tax Regime किंवा New Tax Regime निवडू शकता.