शेअर बाजारात पाऊल टाकण्यापूर्वी त्याविषयी आवश्यक ती माहिती गुंतवणूकदारांना असावी या उद्देशाने सेबीने SEBI Investor Certification Examination सुरु केलेली आहे. भारतातील आर्थिक बाजारामध्ये मुख्यत्वे शेअर बाजारामध्ये कोरोनानंतर नवीन डिमॅट खात्यांची संख्या तसेच mutual fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शेअर बाजार सेबी ( Securities and Exchange Board of India ) द्वारे नियंत्रित केला जातो. परिणामी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे हितरक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा सेबीला पार पाडावी लागते.
SEBI Investor Certification Examination ( SICE )काय आहे ?
सेबीने NISM ( National Institute of Securities Markets ) च्या सहकार्याने या परीक्षेची सुरुवात केलेली आहे.
या परीक्षेचा उद्देश गुंतवणूक करणाऱ्या लोकांमध्ये आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूकदार जागरूकता वाढवणे हा आहे.
बचत आणि गुंतवणुकीच्या मूलभूत संकल्पनाविषयीच्या आवश्यक माहितीने लोकांना सक्षम करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे. संभाव्य गुंतवणूकदारांमध्ये आवश्यक कौशल्य प्राप्त होण्याच्या उद्देशाने गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक साक्षरता आणण्याचा बाजार नियंत्रकांचा उद्देश आहे. आर्थिक बाजारातील गुंतागुंत परिणामकारकरीत्या हाताळणे, योग्य निर्णय घेणे याविषयी संभाव्य गुंतवणूकदारांना सक्षम करण्याचा या परीक्षेचा मुख्य उद्देश आहे.
SICE कोण देऊ शकतो?
भारतातील आर्थिक बाजाराविषयी शिकण्याची इच्छा असलेला प्रत्येक व्यक्ती ही परीक्षा देऊ शकतो. SEBI Investor Certification Examination परीक्षा देण्यासाठी शैक्षणिक पात्रता किंवा वयाची पात्रतेची कोणतीही अट नाही.
परीक्षेचे स्वरूप आणि कालावधी
सदर परीक्षा वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असून ऑनलाईन स्वरूपात आहे. स्वतःच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवरून परीक्षा देता येते.
भाषा – इंग्रजी
परीक्षा कालावधी – १ तास
एकूण प्रश्न – ५०
एकूण गुण – ५०
पास होण्यासाठी आवश्यक किमान गुण – २५
SBI Mutual Fund च्या योजनांमध्ये Investment येथे करा.
परीक्षा शुल्क
सदर परीक्षा निःशुल्क आहे. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या प्रत्येकाला ही परीक्षा देता येईल.
हेही वाचा : Income Tax calculator
परीक्षेचे अभ्यास साहित्य
परीक्षेसाठी आवश्यक अभ्यास साहित्य डिजिटल स्वरूपात खालील लिंकवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.
SEBI Investor Certification Examination अभ्यास साहित्य
SEBI Investor Certification Examination परीक्षेची नोंदणी कोठे व कशी करावी?
सदर परीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी खालील लिंकवर NISM प्रोफाइल तयार करणे आवश्यक आहे.
NISM प्रोफाइल तयार झाल्यानंतर परीक्षेसाठी नोंदणी करता येईल. तुम्हाला सोयीस्कर तारीख व वेळ सुद्धा निवडता येईल. परीक्षेच्या तारखेपासून ६ महिनेपर्यंत कधीही परीक्षा देता येईल. तुम्ही निवडलेल्या परीक्षेच्या तारखेच्या एक दिवस आधी परीक्षेचा युजर आयडी आणि पासवर्ड तुम्ही नोंदविलेल्या ईमेलवर पाठविला जाईल.
Certificate कसे मिळेल ?
सदर परीक्षा पास होण्यासाठी किमान ५०% गुण म्हणजेच किमान २५ गुण मिळणे आवश्यक आहे. २५ पेक्षा जास्त गुण प्राप्त झालेल्या उमेदवारांना परीक्षा झाल्यानंतर २-३ दिवसात ई-मेल वर certificate प्राप्त होईल. सदर प्रमाणपत्राची वैधता २ वर्षांची आहे.
शेअर मार्केट गुंतवणूक सुरू करण्यासाठी नवीन डिमॅट खाते येथे काढा.
आमच्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील व्हा.
सारांश
शेअर बाजारात नेहमी नुकसानच होते हा गैरसमज बहुतांश भारतीय लोकांमध्ये दिसून येतो. शेअर बाजाराविषयी आवश्यक ती माहिती नसल्याने ऐकीव माहितीच्या आधारे लोकांचे मत तसे बनलेले असते. शेअर बाजाराव्यतिरिक्त गुंतवणुकीची आणखी वेगळी साधने भारतीय आर्थिक बाजारात उपलब्ध आहेत. या सर्वांची माहिती व्हावी या उद्देशाने SEBI Investor Certification Examination अतिशय उपयुक्त आहे. सदर परीक्षा निःशुल्क असल्याने प्रत्येकाने या संधीचा फायदा घ्यावा.